Viral News । लग्नानंतर काही दिवसातच पतीला समजले पत्नीचे भयानक रूप!

Marrige

Viral News । सध्या रायपूर मधून एक आगळावेगळा प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर एका पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीमध्ये पतीने म्हटले आहे की, पत्नी गुटखा खात असून लग्नाआधी आपल्याला याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. असा आरोप पतीने केला आहे. त्याचबरोबर पत्नीच्या शरीरातील एक भाग देखील आजारामुळे निकामी झाला आहे. या सर्व गोष्टी लपवून आणि खोटे बोलून लग्न लावण्यात आला असा आरोप पतीने केला आहे.

Rohit Pawar । मॅक्सवेलचं द्विशतक अन् शरद पवारांचा ‘तो’ फोटो, रोहित पवार यांनी केले ट्विट

त्यानंतर ज्यावेळी हा सर्व प्रकार समजला त्यावेळी पत्नी आणि तिचे कुटुंबीय हुंडा प्रकरणी अडकवू अशी धमकी देत असल्याचे पतीने सांगितले. तेथील स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की, गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात महेश कुमारचं लक्ष्मी नावाच्या मुलीशी लग्न झालं होतं. त्यानंतर महेशला आपली पत्नी गुटखा खात असल्याच समजलं त्याचबरोबर तिच्या शरीरातील काही भाग निकामी असल्याची देखील माहिती मिळाली यानंतर महेशला ही माहिती समजताच नाराजी व्यक्त करत पत्नीला लग्नाच्या काही दिवसातच माहेरी पाठवलं.

Manoj Jarange Patil । मराठा समाजाचं जास्त वाटोळं मराठा नेत्यांनीच केलं – मनोज जरांगे पाटील

मात्र हा वाद एवढ्यावर थांबला नाही. यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला याबाबत. महेश ने सांगितले की, लग्नाची मध्यस्ती करणाऱ्या व्यक्तींची भेट घेतली असता त्यांनी देखील मदत केली नाही. त्याचबरोबर लक्ष्मीला घटस्फोट देण्याचा उल्लेख केला तर तिच्या कुटुंबीयांनी हुंडा आणि इतर प्रकरणात अडकवत पैसे लुटण्याची धमकी दिली. त्यानंतर लक्ष्मीने काही दिवसापूर्वी आपल्या कुटुंबीयांना बोलवून महेशच्या कुटुंबीयांवर हल्ला देखील केला. त्यानंतर अखेर महेशने पोलीस स्टेशन गाठलं आणि लक्ष्मी आणि तिच्या कुटुंबीया विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आता या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

Viral Video । चालत्या ट्रेनमधून तरुणीने बाहेर काढले तोंड; समोरच्या ट्रॅकवरून आली दुसरी ट्रेन अन् घडलं भयानक; व्हिडीओ पाहून धक्का बसेल

Spread the love