
Viral News । भारतीय रस्त्यांवर नेहमीच खड्डे पडतात. या खड्ड्यांचा प्रवाशांना त्रास तर होतोच, पण काहीवेळा ते वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरतात. यामुळे रस्त्यावरील प्रवासीही दगावले आहेत. पण हरियाणातील एका 80 वर्षांच्या वृद्धासाठी रस्त्यावरील खड्डाच जीव वाचवणारा ठरला आहे. असा दावा त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
Maratha Reservation । बिग ब्रेकिंग! जरांगेंच्या मुंबईतील सभेबाबत उच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं
NDVV ने दिलेल्या वृत्तानुसार, दर्शन सिंग ब्रार यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. , दर्शन सिंह यांचे कुटुंबीय त्यांचे पार्थिव पतियाळा येथून कर्नालजवळील निसिंग येथील त्यांच्या घरी घेऊन जात होते. जिथे त्यांचे अंतिम संस्कार होणार होते. गावात लाकूडही गोळा करण्यात आले. मात्र, मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा टायर खड्ड्यात गेला अन् मृत व्यक्ती हालचाल करू लागली.
ब्रार कुटुंबीयांनी सांगितले की, रुग्णवाहिकेत त्यांच्यासोबत असलेल्या दर्शन सिंह यांच्या नातवाने त्यांना हात हलवताना पाहिले. त्यांना हृदयाचा ठोका जाणवू लागल्याने त्यांनी रुग्णवाहिका चालकाला जवळच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथे डॉक्टरांनी दर्शन सिंगला जिवंत घोषित केले. सध्या वृद्ध दर्शन सिंह यांची प्रकृती स्थिर आहे. कुटुंबीयांनी या घटनेला चमत्कार म्हटले आहे आणि आता ते लवकर बरे व्हावेत आशा व्यक्त केली आहे.
Supriya Sule । प्रकाश आंबेडकरांशी युती करण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी केले सर्वात मोठे वक्तव्य