Viral News । लग्नाच्या नावाखाली दलालीसह फसवणूक, लुटमारीचे प्रकार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यात सातत्याने वाढ होत आहे. बिहारमधील कैमूर जिल्ह्यातून एक ताजं प्रकरण समोर आलं आहे. जिथे लग्नाच्या बहाण्याने दोन राजस्थानी तरुणांना आधी कैमूर जिल्ह्यातील भगवाननपूर पोलीस स्टेशन हद्दीतील उमापूर गावात बोलावण्यात आले.
Arvind Kejriwal Bail । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर
यानंतर मंत्रोच्चार करून दोन्ही मुलांचे लग्न वेगवेगळ्या मुलींशी लावून दिले. यानंतर दोन्ही तरुण नववधूला घेऊन जात असताना वाटेत दुचाकीस्वार तरुणांनी ऑटोवर बसलेल्या वधू-वरांना अडवले. यानंतर दोन्ही नववधूंनी दुचाकीवर बसून लग्नात मिळालेली रोख रक्कम, दागिने आणि मौल्यवान कपडे घेऊन पळ काढला. त्यानंतर आपण फसवणुकीला बळी पडल्याचे दोन्ही तरुणांच्या लक्षात आले. यानंतर सरपंचाला माहिती देण्यात आली आणि सरपंचांनी पोलिसांना माहिती दिली.
राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील चैनपुरा दादली गावचे रहिवासी दन्नाराम मौर्य यांचा मुलगा जगदीश प्रसाद मौर्य आणि निमका पोलिस स्टेशन जिल्ह्यातील खेत्री तहसील अंतर्गत पंपुर्णा गावचे रहिवासी कै. छजू राम कुमवत यांचा मुलगा श्रवण कुमार याने दोन वेगवेगळ्या नववधूंशी लग्न केले होते.