Viral News । महाराष्ट्रातील शाहपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची घटना समोर आली आहे. खेळताना पायाला दुखापत झाल्याने एक बालक उपचारासाठी येथे आला होता. डॉक्टरांनी तपास करून पायाचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर डॉक्टरांनी मुलाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टचे ऑपरेशन केले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळताच मुलाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला.
Pune Accident l पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी एकनाथ शिंदेनी घेतला सर्वात मोठा निर्णय!
यानंतर डॉक्टरांनी निष्काळजीपणा मान्य करत मुलाला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेले आणि त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा १४ वर्षांचा मुलगा प्रीतम सुरेश पागे खेळत असताना पायाला दुखापत झाली. मुलाच्या वडिलांनी त्याला शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जिथे डॉक्टरांनी मुलाच्या पायाचा एक्स-रे काढला आणि सर्व रिपोर्ट पाहून पायावर ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. कुटुंबीयांनी होकार दिल्यावर डॉक्टरांनी मुलाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले.
काही वेळाने मुलाला पोस्ट ऑपरेशन वॉर्डमध्ये हलवण्यात आले. तेथे मुलाच्या आईने आपल्या मुलाच्या पायावर झालेली जखम पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी पायावर कोणतेही ऑपरेशन झाले नसल्याचे समोर आले. त्याऐवजी मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे ऑपरेशन करण्यात आले आहे. डॉक्टरांनी घाईघाईने मुलाला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेले आणि त्याच्या पायावर शस्त्रक्रिया केली.