Site icon e लोकहित | Marathi News

Viral News । ऐकावं ते नवलच! मटन नल्लीवरून वऱ्हाडीमध्ये जोरदार भांडण… लग्नही मोडलं; कारण एकूण पोलीसही चक्रावले

Viral News

Viral News । मानपानं न मिळाल्यामुळे लग्नात अनेक जणू रुसतात. बऱ्याचदा घेण्या देण्यावरून त्याचबरोबर जेवणावरून लग्नातील कुटुंबांमध्ये वादही होतच असतात. सध्या लग्नामध्ये असं भांडण झालं आहे जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. जेवणात फक्त मटन नल्ली मिळाली नाही म्हणून वरात घेऊन आलेले सगळे एवढे चिडले की वराकडील लोकांनी सरळ लग्नच मोडलं आणि वधूला न घेता वरात तशीच माघारी गेल्याची घटना घडली आहे.

Abhishek Bachchan । “त्यावेळी अंगावर कपडेही..” अभिषेक बच्चन याने सांगितलं ‘तो’ अनुभव

मीडिया रिपोर्टनुसार, तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. लग्नात मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी मांसाहारी जेवणाची व्यवस्था केली होती. पहिल्यांदा सर्व काही सुरळीत चालले होते. मात्र मटण नल्ली न मिळाल्याने लग्नात आलेल्या पाहुण्यांनी अचानक गोंधळ सुरू केला आणि हा वाद एवढा वाढला की, मुलाच्या कुटुंबाने थेट लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आणि वरात तशीच माघारी गेली.

Maratha Reservation । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगेंची सभा घेणाऱ्या ११ आयोजकांवर गुन्हा

जेवणात मटन नल्ली देण्यात आली नाही. त्यामुळे वधू कडची मंडळी आणि वराकडचे नातेवाईक यांच्यात भांडण सुरू झाले. हा वाद एवढा वाढला की, हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले पोलिसांनी वराला आणि त्याच्या कुटुंबीयांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी पाहुण्यांना मटण नल्ली न दिल्याने अपमान केला आहे असे सांगून वराकडील मंडळींनी लग्न मोडले.

Car Accident । क्षणात होत्याच नव्हतं झालं, चालत्या कारवर ट्रक उलटला; संपूर्ण कुटुंब उध्वस्त

Spread the love
Exit mobile version