सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. (Every day new videos are going viral on social media) काही व्हिडीओ आपल्याला हसवणारे असतात तर काही व्हिडीओ आपल्याला थक्क करणारे असतात. सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये वधू-वर लग्नाच्या मंचावर विधी पूर्ण करत आहेत, तेवढ्यात तिथे एक व्यक्ती पोहचतो आणि नवरीला सिंदूर लावतो.
तुम्ही पाहू शकता की, वधू आणि वर लग्नाचे विधी पूर्ण करत आहेत. वधूच्या बाजूची एक स्त्री वराला सिंदूर देत आहे, मंत्रोच्चार आणि लोकगीतांच्या दरम्यान, एक व्यक्ती येतो आणि जबरदस्तीने वधूच्या डोक्यात सिंदूर भरतो.
हा व्हिडीओ asliashishmisra या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
ब्रेकिंग! शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार, 9 जणांचा जागीच मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी