नवरा बायकोचे नाते गमतीशीर असते. त्यांच्यात कधी प्रेम असते तर कधी भांडण ! ( Wife & Husband Relationship) सामान्यपणे सगळेच नवरा बायको भांडतात. दोन वेगवेगळी माणसे भरपूर काळासाठी एकत्र राहत असतील तर त्यांच्यात वाद होणे साहजिक आहे. नवरा बायकोच्यात सुद्धा नेहमीच वाद होत असतात. मात्र हे वाद चार भिंतीच्या आत ठेवले जातात. घराबाहेर किंवा रस्त्यावर कोणी साहसा भांडत नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
यामध्ये भर रस्त्यावर नवरा बायकोमध्ये भांडण लागले आहे. एवढंच नाही तर बायको नवऱ्याला बेदम मार देखील देत आहे. व्हिडीओमध्ये एक शॉर्ट ड्रेस घातलेली मुलगी रस्त्यात डान्स करत आहे. यावेळी महिलेचा नवरा मुलीसोबत डान्स करायला जातो. हे पाहून महिलेचा राग अनावर होतो आणि संतापलेली महिला म्हणजेच त्या माणसाची बायको सर्व माणसांच्या समोर त्याला मारायला लागते. ( Viral Video)
Amol Kolhe । मोठी बातमी! खासदार अमोल कोल्हे जखमी
तिथे उपस्थित असणारे सर्वच लोक हा नवरा बायकोचा हा तमाशा मजा घेत पाहताना दिसत आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये एकाने म्हंटले आहे की, ती व्यक्ती आता जिवंत आहे का ? तर दुसऱ्या एका व्यक्तीने कमेंट केली आहे की, त्याच्या पत्नीला आपल्या पतीला राजा सोलोमन बनताना पहायचे नाही.
RIP pic.twitter.com/5MEeBgfcX7
— The Figen (@TheFigen_) April 29, 2023
Amazon Prime | अॅमेझॉन प्राईम मेंबरशिपच्या किंमतीत वाढ; ग्राहकांना मोठा धक्का