Viral Video । भारतात वर्षानुवर्षे एक म्हण प्रचलित आहे – अतिथी देवो भव: म्हणजे पाहुणे हा देवासारखा आहे. म्हणजे भारतात कोणाच्या घरी पाहुणे आले की त्याला खूप आदराने वागवले जाते. त्याला खूप आदर दिला जातो. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतातील काही लोक ‘अतिथी देवो भव’ या उक्तीला फाटा देत आहेत. दक्षिण कोरियातील एका ब्लॉगरला भारतात अशीच वागणूक मिळाली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोरियन ब्लॉगरसोबत गैरवर्तन
दक्षिण कोरियातील ब्लॉगर महिला सध्या भारतात आली आहे. ती महाराष्ट्राच्या स्थानिक बाजारपेठेला भेट देण्यासाठी गेली होती. त्यानंतर तीच्यासोबत असे काही घडले ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती. जर महिला ब्लॉगर नसती तर कदाचित इतरांना ही घटना कळली नसती. ही महिला स्थानिक बाजारात गेली तेव्हा एक व्यक्ती जबरदस्तीने तिच्या जवळ आला.
China Earthquake । ब्रेकिंग! चीनमध्ये मोठा भूकंप, घरे जमीनदोस्त झाली; शेकडो लोकांचा मृत्यू
त्या व्यक्तीने तिच्या गळ्यात हात घातला आणि फोटो क्लिक करायला सुरुवात केली. तो व्यक्ती कोरियन महिलेला स्वतःकडे ओढू लागले. थोड्या वेळाने त्या माणसाने आपले दोन्ही हात महिलेच्या खांद्यावर ठेवले. यामुळे ती खूप अस्वस्थ होती. ज्याचा उल्लेखही तिने त्यावेळच्या व्हिडिओमध्ये केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Maharashtra Politics । सर्वात मोठी बातमी! विरोधी पक्षाच्या ३३ खासदारांचं निलंबन, नेमकं कारण काय?
🇮🇳Korean Vlogger Kelly Got Harassed In India pic.twitter.com/u1i7jCPhxu
— Anand Tate (@anandtatepajeet) December 15, 2023