Viral Video । भारतात रेल्वेमध्ये प्रवास करताना, तुम्हाला अनेकदा ट्रेनमध्ये भिकारी किंवा किन्नर पैसे मागताना दिसतात. ही घटना तुमच्यासोबतही अनेकदा घडली असेल. अशा प्रसंगी लोक पैसे देतात. मात्र कधी कधी अशा प्रसंगी प्रवासी पैसे देण्यास नकार देतात. त्यामुळे किन्नर गैरवर्तनाचा अवलंब करतात. सध्या देखील बिहारच्या पाटणा-कटिहार इंटरसिटीमधून असेच एक प्रकरण व्हायरल होत आहे.
Ketki Chitle । मनोज जरांगेंचे फडणवीसांवर आरोप; केतकी चितळे म्हणाली, “एका मोर्चा धारक…”
तुम्ही अनेकदा किन्नर लोकांना ट्रेनमध्ये पैसे मागताना पाहिलं असेल. पण काही वेळा पैसे न दिल्यास किन्नर मारहाण करू लागतात. कटिहार पाटणा इंटरसिटीवरून असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे किन्नर ट्रेनमध्ये चढले आणि प्रवाशांकडून पैसे मागू लागले. आणि काही प्रवाशांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
Ajay Baraskar । फडणवीसांसोबतच्या फोटोवर अजय बारसकरांच दिल स्पष्टीकरण
ही घटना २४ फेब्रुवारीच्या रात्री घडली. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @aazdrajeev नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
यह वीडियो 15713 कटिहार-पटना इंटरसिटी का है। ट्रेन में खगड़िया से किन्नरों का जत्था चढ़ा और यात्रियों से जबरदस्ती पैसा वसूलने लगा। उमेशनगर और एसकमाल के बीच पैसा नहीं देने वाले यात्रियों की इन किन्नरों ने बेहरमी से पिटाई कर दी। यात्रियों की कोई सुध लेने वाला नहीं है, सब रामभरोसे. pic.twitter.com/J1bkX7Bo0m
— आजाद राजीव (@aazadrajeev) February 24, 2024