
Viral Video On Social Media । सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ गमतीशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात. लहान मुलांच्या भांडणाचे तसेच तरुण मुलांच्या भांडणाचे आणि महिलांच्या भांडणाचे तर व्हिडिओ सोशल मीडियावर सतत कायम व्हायरल होत असतात. एसटीमध्ये सीट मिळवण्यासाठी किंवा अन्य कृतींसाठी तर महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर कायमच व्हायरल होतात. सध्या देखील डोंबिवली मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Mumbai News )
Sharad Pawar । “भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग होतोय” शरद पवारांचा गंभीर आरोप
डोंबिवली मधील रामनगर पोलीस ठाण्यासमोरच भर रस्त्यात दोन फेरीवाल्या महिलांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी होत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा तमाशा चक्क रेल्वे स्टेशन समोर असलेल्या डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यासमोरच 25 मिनिटे सुरू होता. त्यानंतर नागरिकांनी मध्यस्थी करत हे प्रकरण सोडवले मात्र पालिका प्रशासन आणि पोलीस याकडे कधी लक्ष देणार? असा सवाल आता नागरिक करत आहेत.
मागच्या काही दिवसापासून कल्याण डोंबिवली शहरांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सतत काही ना काही घटना या ठिकाणी घडत असतात. त्यामुळे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत पोलिसांनी काहीतरी ठोस पाऊल उचलणं महत्त्वाचं असल्याचं मत नागरिकांचं आहे.
Sharad Pawar । शरद पवारांनी मोदी सरकारला दिला मोलाचा सल्ला म्हणाले; “त्यावर …”
डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर महिलांमध्ये हाणामारी pic.twitter.com/LpJIjVierV
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) September 5, 2023