Viral Video । मागच्या चार पाच दिवसापूर्वी कर्नाटकातील मुरुगमल्ला चिक्कबल्लापूर जिल्ह्यात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यासोबत सरकारी शाळेतील शिक्षिकेचे रोमँटिक फोटोशूटचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले, त्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर (BEO) कडे तक्रार केली. शिक्षकाच्या वर्तनाची सखोल चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली. दरम्यान आता या संपूर्ण प्रकरणावर स्वतः शिक्षिकेने प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर या कृत्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया संताप व्यक्त केला होता. यावर शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिकेला फोटोशूटबद्दल विचारल्यावर तिने आपल्यामध्ये आई-मुलाचं नातं आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर हे फोटो खासगी असून ते लीक झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
सध्या या मुख्याध्यापिकेची निलंबनाची प्रक्रिया सुरु आहे. जोपर्यंत ही प्रक्रिया सुरु आहे तोपर्यंत मुख्याध्यापिकेला माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं खूप भारी असतं. शाळेला विद्येचे मंदिर म्हटले जाते आणि त्यामध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना गुरु मानलं जातं. मात्र यात शिक्षेच्या मंदिरात शिक्षकांकडून नको ते कृत्य होत असेल तर काय करायचं? असा सवाल अनेकदा पालकांना पडला आहे.
Nashik Crime News । 31 डिसेंबरच्या रात्री मुंबई-आग्रा महामार्गावर थरार; प्रवाशांसोबत घडलं भयानक