
Viral Video । तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा (Telangana Assembly Elections) प्रचार जोरात सुरू आहे. अनेक रॅली, जाहीर सभा, नेत्यांचे रोड शो होत आहेत. येथे लढत भारत राष्ट्र समिती, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात आहे. दरम्यान, अशातच तेलंगणाचे मंत्री आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांचे सुपुत्र केटीआर राव (KTR Rao) यांच्या रॅलीमध्ये मोठी दुर्घटना झाली. ज्याचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
Sharad Pawar । मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार स्वत: हजर
ते एका वाहनाच्या वर उभे राहून रोड शो करत होते. दरम्यान, कारला अचानक ब्रेक लागला आणि केटीआर आणि इतर नेते खाली पडले. केटीआर यांच्यासोबत पक्षाचे खासदार सुरेश रेड्डीही (Suresh Reddy) आहेत. ते देखील खाली पडतात. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाल्याची माहिती नाही.
निजामाबाद जिल्ह्यातील आर्तुर गावात ही रॅली सुरू होती. यावेळी ही दुर्घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, मंत्री केटीआर राव यांची प्रचार रॅली गावातून जात आहे. यावेळी केटीआर राव यांच्यासह अनेक नेते प्रचाररथाच्या वरती चढले आहेत. अचानक गाडीचा ड्रायव्हर जोरदार ब्रेक मारतो. ज्यामुळे रथाचे रेलिंग तुटते. आणि नेते खाली पडतात.
#WATCH | Telangana Minister and BRS leader KTR Rao fell down from a vehicle during an election rally in Armoor, Nizamabad district.
— ANI (@ANI) November 9, 2023
More details awaited. pic.twitter.com/FSNREb5bZZ
Ajit Pawar । दिवाळी पाडव्याला अजित पवार गोविंद बागेत उपस्थित राहणार का? समोर आली मोठी माहिती