सध्याच्या काळात सोशल मीडिया ( Social Media) हे लोकांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, whatsapp व ट्विटरवर लोक कायम सक्रिय असतात. यावर विविध प्रकारचा कंटेंट उपलब्ध असतो. विशेष बाब म्हणजे सोशल मीडियावर सतत नव-नवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. एका महाकाय शक्तिशाली अजगराने बकरीची ( Goat) शिकार केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये एका अजगराने ( Python) बकरीची शिकार केली आहे. ते अजगर एका बकरीला फस्त करून थांबत नाही. ते लगेच दुसऱ्या बकरीला फस्त करण्याच्या तयारीत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अजगराचे पोट फुगलेले आहे.हे अजगर अंदाजे आठ फुटाचे असून हा प्रकार पाहून लोक सुद्धा भयभयीत झालेले दिसत आहेत. (Python attacks on goat)
व्हायरल होणारा हा व्हिडीओ धुळे जिल्ह्यातील आहे. या घटनेची माहिती स्थानिकांनी सर्पमित्रांना दिली. यामुळे सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. खरंतर पोटात बकरी असल्याने अजगराला हालचाल करणे कठीण झाले होते. मात्र सर्पमित्रांच्या मदतीने अजगराला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.