Site icon e लोकहित | Marathi News

Viral Video । दिल्ली विमानतळावर फ्लाईटला उशीर झाल्याने प्रवाशी संतापला, पायलटला केली मारहाण; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Viral Video

Viral Video । सध्या सगळीकडे थंडी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे धुके देखील जास्त प्रमाणात पडत आहे. धुक्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण देखल वाढत आहे. यालाच रोखण्यासाठी जर धुके जास्त आले तर फ्लाईट, बस याला उशीर होत आहे. दरम्यान, इंडिगोच्या फ्लाइटमध्ये एक दृश्य दिसले ज्यामुळे सर्वजण थक्क झाले आहे. फ्लाइटला उशीर झाल्यामुळे प्रवाशाने संतापून पायलटला मारहाण केली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हे प्रकरण आहे.

Ajit Pawar । मोठी बातमी! अजित पवार यांचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

इंडिगो फ्लाइटला उशीर झाल्यामुळे वैतागलेल्या एका प्रवाशाने वैमानिकाला धक्काबुक्की केल्याचे वृत्त आहे. धुक्यामुळे उड्डाणाला विलंब होत होता, मात्र प्रवाशांना योग्य माहिती दिली जात नव्हती. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. आयजीआय पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Politics News । राजकारणात मोठा भूकंप येणार? विश्वास बसणार नाहीत असे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार; राजकीय हालचालींना वेग

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात एव्हिएशन सिक्युरिटी एजन्सीने तपास सुरू केला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी संध्याकाळी 7 वाजता घडली. विमान दिल्लीहून गोव्याला जात होते.

Manoj Jarange । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगेंचं मुंबईतील आंदोलन फसणार? गुणरत्न सदावर्तेंची मुंबई हायकोर्टात धाव

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, फ्लाइटमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने विमानाच्या पायलटला उड्डाणाच्या विलंबाबाबत घोषणा करत असताना मारहाण केली. या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पिवळा हुडी घातलेला एक प्रवासी अचानक शेवटच्या रांगेतून धावत आला आणि त्याने पायलटला धक्काबुक्की केली.

Parbhani Accident News । स्कॉर्पिओ आणि दुचाकीचा अतिशय भीषण अपघात; पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

Spread the love
Exit mobile version