
Viral Video । सोशल मीडियावर (Social media) प्रसिद्ध होण्यासाठी लोक विविध पद्धतींचा अवलंब करू लागले आहेत. अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणीही लोक विचित्र कृत्य करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्याच्या मधोमध वाहतूक थांबवून नाचताना दिसत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूपच मजेदार वाटत आहे. त्याचबरोबर अनेक यूजर्सनी या पोस्टवर आपला संतापही व्यक्त केला आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. ती ट्रॅफिक थांबवते, रस्त्याच्या मधोमध पोहोचते आणि बॉलिवूड गाण्यावर नाचू लागते. विशेष म्हणजे लोकही मुलीचा डान्स पाहताना दिसत आहेत. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sarcasticschool_ हँडलसह शेअर केले गेले आहे, जे आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर अनेक यूजर्सनी यावर आपली प्रतिक्रियाही दिली आहे.
Dolly Chaiwala । अरे बापरे! चायवाला डॉली आहे लाखो रुपयांचा मालक, आकडा जाणून तुम्हालाही बसेल धक्का
व्हायरल व्हिडिओ पाहून लोक संतापले
व्हायरल व्हिडिओ पाहून लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘इंटरनेट महाग होते पण चांगले होते’, दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘आमची पिढी चांगली होती.’ इतर अनेक युजर्सनी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Amravati News । बच्चू कडू समर्थक-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, नेमकं कारण आलं समोर