विराट-अनुष्काला चाहत्यांकडून धक्काबुक्की! व्हिडीओ होतोय व्हायरल

Virat-Anushka shocked by fans! The video is going viral

सेलिब्रिटींना चाहत्यांकडून प्रेम भेटते, तेवाढच त्रास देखील होतो. बऱ्याचदा चाहत्यांकडून धक्काबुक्की होण्याचे प्रकार देखील घडतात. अगदी असाच प्रकार नुकताच विराट कोहली व अनुष्का शर्मा सोबत घडला आहे. भारताचा स्टार क्रिकेटर ( Star cricketer) विराट कोहली व बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा हे प्रसिध्द सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. (Anushka Sharma & Virat Kohali) नुकतेच हे दोघेही लंच डेटसाठी जाताना स्पॉट झाले. यावेळी त्यांना चाहत्यांकडून जोरदार धक्काबुक्की झाली.

शरद पवारांचा भाजपला इशारा! म्हणाले,”भाजपने कोणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर…”

आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबी टीमने नुकताच राजस्थान रॉयल्स सोबतचा सामना जिंकला. ( RCB vs RR) यापूर्वी टीमला एक दिवसाची विश्रांती देण्यात आली होती. म्हणून विराट कोहली व अनुष्का शर्मा म्हणजेच आपले विरुष्का लंच डेट साठी बाहेर पडले. बेंगळुरूमधील सीटीआर मल्लेश्वरम हॉटेलमध्ये साऊथ इंडियन जेवणाचा यावेळी त्यांनी आनंद लुटला. मात्र, येथून बाहेर पडताना चाहत्यांच्या गर्दीने त्यांना घेरले.

“माझ्या मुलाला आमदार करा, तो फक्त १ रुपयात…”, शेतकरी आईचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

ही गर्दी इतकी मोठी होती की, चाहत्यांना देखील ही गर्दी सांभाळणे कठीण झाले. महत्त्वाची बाब म्हणजे RCB.. RCB.. विराट..विराट असे म्हणत चाहत्यांनी यावेळी मोठा गलका केला. या दोघांना एकदा पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोक प्रचंड उत्सुक होते. यामुळे विरुष्काला गर्दीतून बाहेर पडणे कठीण झाले. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यंदाही राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता; रोगराई वाढणार! भेंडवळच्या ‘घटमांडणी’ चा अंदाज

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *