
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार्या पहिल्या T20 सामन्यापूर्वी दोन्ही संघ जोरदार सराव करत आहेत. दरम्यान, रविवारी विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही डान्स करताना दिसतायेत. व्हिडिओमध्ये, दोन्ही स्टार्सनी सनग्लासेस घातले आहेत आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.
दरम्यान, सराव सत्रात भारतीय खेळाडूंनी भरपूर कष्ट केले. दुसरीकडे भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूही मेहनत घेत आहेत. याआधी संघाचा फलंदाज टिम डेव्हिडचा एक व्हिडिओही समोर आला होता ज्यामध्ये तो गोलंदाजांना मारहाण करताना दिसत होता.
सध्या सोशल मीडियावर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यावर नेटकरी वेगेवेगळ्या कमेंट करताना दिसतायेत.