Site icon e लोकहित | Marathi News

विराट कोहली आणि रोहित शर्मा वर्ल्डकप जिंकवून देणार नाहीत ; कपिल देव यांचे गंभीर विधान

विराट कोहली आणि रोहित शर्मा

भारतीय क्रिकेट संघ सध्या हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली श्रीलंकेविरोधात T20 सिरीज खेळत आहे. ही मालिका भारतीय संघासाठी परिवर्तनाची लाट घेऊन येणारी ठरू शकते अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. दरम्यान सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी मोठे विधान केले आहे.

सोलापूरातील हॉटेल चालकाची अनोखी शक्कल ! गौतमी पाटील च्या नावाने सुरू केली थाळी

भारतीय क्रिकेट संघ विराट कोहली व रोहित शर्मा (Rohit Sharma) या खेळाडूंच्या भरवश्यावर वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करत असेल तर हे शक्य नाही. कारण, फक्त एक-दोन खेळाडूंच्या जीवावर वर्ल्डकप जिंकता येत नाही. असे सांगत कपिल देव यांनी भारताने वर्ल्डकप जिंकण्यासाठी संघातील सर्वच खेळाडूंचा सहभाग व कामगिरी महत्त्वाची असल्याचे म्हंटले आहे.

ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका?; गृहमंत्रालयाकडून वाढविण्यात आली सुरक्षा

मागील पूर्ण दशकात टीम इंडियाने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे प्रत्येक भारतीयांचे वर्ल्डकप ट्रॉफी कडे लक्ष लागले आहे. 2013 मध्ये भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली होती. यानंतर थेट 2022 मध्ये 20-20 वर्ल्डकपमध्ये भारत संघ सेमीफायनल पर्यंत पोहचला होता. परंतु, यामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळे अगामी काळात भारतीय क्रिकेट संघाकडून भरपूर अपेक्षा आहेत.

बीसीसीआयला नवीन धक्का; भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीत अचानक झाला ‘हा’ बदल!

Spread the love
Exit mobile version