Site icon e लोकहित | Marathi News

के एल राहूलला लग्नामध्ये विराट कोहलीने गिफ्ट केली BMW कार! किंमत ऐकून व्हाल थक्क

Virat Kohli gifted KL Rahul a BMW car in his wedding! You will be surprised to hear the price

अभिनेत्री आथिया शेट्टी (Aathiya Shetty Wedding) व क्रिकेटर के एल राहूल ( KL Rahul) यांनी ( दि.23) लग्नगाठ बांधली. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊस मध्ये दाक्षिणात्य पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी ठराविक लोकांचीच उपस्थिती होती. या दोघांच्या लग्नाची मीडियामध्ये बरीच चर्चा झाली.

शरद पवारांविषयी आदर राखून बोलावे, संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकर यांना इशारा

अथिया-राहुल मागील 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आणि आता ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. अवघ्या 100 लोकांच्या उपस्थितीमध्ये या दोघांचा विवाह सोहळा पार पडला आहे. यावेळी लग्नामध्ये कोणी काय गिफ्ट दिलं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या विराट कोहलीने दिलेल्या गिफची जोरदार चर्चा चालू आहे.

एक दोन नव्हे तब्बल आठ जणांनी केला स्कुटीवर एकत्र प्रवास; पाहा व्हायरल VIDEO

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीने केएल राहुल आणि त्याची पत्नी आथिया शेट्टी या जोडीला आलिशान BMW कार गिफ्ट केली आहे. या कारची किंमत 2.17 कोटीच्या घरात आहे. सध्या याचीच सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे.

सुप्रिया सुळेंना पहिल्या नजरेतच खूप आवडला होता ‘हा’ अभिनेता; स्वतःच केला खुलासा

दरम्यान लग्नाच्या रिसेप्शन बद्दल विचारण्यात आले असता अभिनेते सुनील शेट्टी ( Sunil Shetty) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. के एल राहुलच्या आयपीएल सामन्यांनंतर रिसेप्शन होणार आहे. यावेळी ते म्हणाले की, “केएल राहुल हा माझा जावई नसून मुलगाच आहे. मी जरी नात्याने त्याचा सासरा असलो तरी तो माझा मुलगाच आहे.”

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचं निधन

Spread the love
Exit mobile version