Virat Kohli । भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. त्याच्या फलंदाजीमुळे संपूर्ण जगभरातील क्रिकेट चाहत्यांना भुरळ घातली आहे. तो सोशल मीडियावर (Social media) सक्रिय असून त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. नुकतीच क्रिकेट विश्वामध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्यांच्या यादीत त्याने आघाडी घेतल्याने तो आता सर्वात जास्त कमाई करणारा जगातील तिसरा खेळाडू झाला आहे. (Latest Marathi News)
Sanjay Raut । नवाब मलिकांना जामीन कसा मिळाला? राऊत म्हणाले, नवीन इंजेक्शन घेतले …
सध्या तो एका इंस्टाग्राम पोस्टसाठी तब्बल 14 कोटी रुपये घेतो, असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात होता. (Virat Kohli Instagram Post Price) त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. अखेर त्याने त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मी इतके पैसे घेत नाही. कमाईबद्दलच्या सर्व बातम्या खोट्या आहेत,” असे स्पष्टीकरण कोहलीने दिले आहे. त्यामुळे त्याच्या कमाईबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. (Virat Kohli Insta Post Value)
कोहलीच्या नावावर आतापर्यंत असंख्य रेकॉर्ड आहेत. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) अनेकदा विजयाला गवसणी घातली आहे. तो भारतात इंस्टाग्राम फॉलोवर्सच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे इंस्टाग्रामवर एकूण 177 मिलियन इतके फॉलोवर्स आहेत. त्यामुळे त्याची क्रिकेटपेक्षा इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील चांगली कमाई होते.