Virat Kohli | टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि RCB कर्णधार विराट कोहली मैदानावर किती आक्रमक असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तो आरसीबीकडून खेळत असला किंवा भारतासाठी, त्याच्यातील तीव्रता कधीच कमी होत नाही. त्याचा असाच आक्रमक फॉर्म आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराट कोहलीने सीएसकेचा सलामीवीर रचिन रवींद्रला वेगळ्या पद्धतीने निरोप दिला.
यावेळी त्याने काही अपशब्द वापरले जे कॅमेऱ्यात कैद झाले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना सीएसकेसमोर १७४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना सीएसकेचे सलामीवीर रचिन रवींद्र आणि रुतुराज गायकवाड यांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली.
BJP Candidate List । ब्रेकिंग! भाजपनं जाहीर केली चौथी यादी, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली संधी
धावसंख्येचा पाठलाग करताना सीएसकेने 7व्या षटकात 70 धावा ओलांडल्या होत्या. पदार्पणाच्या सामन्यात रचिन रवींद्रने शानदार फलंदाजी केली. रचिनने 15 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 37 धावांची तुफानी खेळी केली. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 246.67 होता. 7व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रचिन दुसरा मोठा शॉट खेळायला गेला तेव्हा डीप मिड-विकेटवर उपस्थित असलेल्या रजत पाटीदारने त्याला झेलबाद केले. रचिनची ही विकेट आरसीबीसाठी खूप महत्त्वाची होती. तर कोहलीने रचिनला बाद केल्यानंतर त्याला निरोप दिला.
Shame on you #Viratkohli
— 𝕏`ℝ𝕆ℍ𝕀𝕋 (@cap_x_mahesh) March 22, 2024
Virat Kohli abusing and doing sending off gesture to a 22yrs old youngster Rachin ravindra.
People call him king but his attitude and ego don't deserve this name! #CSKvRCB #WhistlePodu #IPLonJioCinema #CSK #TATAIPL2024
pic.twitter.com/iZPPQQl5cW
Loksabha Elections 2024 । सातारच्या राजकारणात मोठी खळबळ! उदयनराजे भोसले नाराज, दिल्लीत ठोकला तळ
विराट कोहली सोशल मिडियावर ट्रोल
यादरम्यान, विराट कोहलीने (Virat Kohli ) काही अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. त्याच्या या व्हिडिओवर सोशल मिडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.