Virat Kohli Retirement । वन डे वर्ल्ड कपच्या (World Cup) अंतिम फेरीमध्ये भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. संघाची एकंदरीत संपूर्ण कामगिरी उत्तम होती. यंदाची ट्रॉफी भारतीय संघ (Indian team) उचलणार असे सर्वांना वाटत होते. ऑस्ट्रेलियाच्या संघाने २४१ धावांचे लक्ष्य सहज पार केले. या स्पर्धेत भारतीय संघाचा सर्वोत्तम क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) चांगली कामगिरी केली.
अशातच आता विराट कोहलीबाबत एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यावरून निवृत्तीची चर्चा (Virat Kohli Retirement Prediction) रंगू लागली आहे. सध्या सोशल मीडियावर (Social media) एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. यात कोहलीच्या कारकिर्दीबद्दल (Retirement) आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल भविष्यवाणी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या भविष्यवाणीमध्ये जे जे सांगितले गेले ते सर्व खरे ठरले आहे.
An astrology prediction about Virat Kohli made in 2016 seems to have come true with everything written there 😳 pic.twitter.com/BdnJ9hV3xy
— BALA (@rightarmleftist) November 21, 2023
Salman Khan Viral Video । सलमानने भर गर्दीतच महिला पत्रकाराला केलं किस; व्हिडीओ झाला व्हायरल
पोस्टमध्ये कोहली निवृत्त कधी होणार याबाबत दावा केला आहे. विराटच्या कारकिर्दीतील २०२५ ते २०२७ हा सर्वात वाईट काळ असणार आहे. २०२७ या कालावधीमध्ये तो आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. या भविष्यवाणीमुळे चाहत्यांना एकच धक्का बसला आहे. दरम्यान, आता ही भविष्यवाणी खरी ठरते की खोटी? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
Rohit Pawar । रोहित पवार यांना मोठा धक्का! कट्टर समर्थक राम शिंदेंकडे जाणार?