
Virat Kohli । विराट कोहली हा भारतीय संघाचा (Indian teams) महत्त्वाचा फलंदाज आहे. त्याचे सोशल मीडियावर (Social media) खूप चाहते आहेत. सतत तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी येतो. नुकतीच आशिया कप (Asia Cup) स्पर्धा पार पडली. त्यात चांगली कामगिरी केली. सध्या त्याच्या बॅटिंग ग्लोजची (Batting Gloves) चर्चा सुरु झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. या ग्लोजला खूप मोठी बोली मिळाली आहे. आकडा जाणून तुम्हीही हैराण व्हाल. (Virat Kohli Batting Gloves Price)
Ajit Pawar । “दंगलीसारख्या घटना कुणालाही परवडत नाहीत” – अजित पवार
मागील वर्षी टी-20 वर्ल्डकप (T-20 World Cup) स्पर्धेत त्याने गोलंदाजांना खूप धुतले होते. त्याची ती दमदार खेळी आजही चाहते विसरले नाहीत. त्याने अशक्य वाटणारे लक्ष्य अवघ्या 53 चेंडूंमध्ये केलेल्या नाबाद 82 धावांमुळे सहज शक्य झाले होतं. नुकताच विराट कोहलीने या खेळीदरम्यान वापरलेल्या बॅटिंग ग्लोजचा लिलाव (Batting Gloves Auction) पार पडला आहे. त्यात या ग्लोजला मोठी बोली मिळाल्याने सध्या त्याची चर्चा रंगली आहे.
या ग्लोजसाठी एकूण 3.20 लाख रुपयांची बोली लागली असून हार्व क्लेरने हे ग्लोज विकत घेतले आहे. 13 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे हा लिलाव झाला आहे. हे पैसे विराट चॅपेल फाऊंडेशनला देणार असून ऑस्ट्रेलियातील बेघर लोकांसाठी पैसे गोळा करण्याचं संस्थेकडून केले जाते. दरम्यान, विराट कोहलीने स्वत: हे ग्लोज खेळीनंतर या संस्थेला दान केले होते.
Amruta Fadnavis । मोठी बातमी! अमृता फडणवीस खंडणीप्रकरणी अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर