
Virat Kolhi । बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा आई झाली आहे. अभिनेत्रीने नुकतेच एका मुलाला जन्म दिला आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने सुरुवातीपासूनच त्यांची दुसरी गर्भधारणा लपवून ठेवली होती. मात्र, काही काळापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज आणि विराटचा जवळचा मित्र एबी डिव्हिलियर्सने याबाबत इशारा दिला होता. मात्र या जोडप्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आता अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे.