मुंबई : आशिया चषकात काल भारत विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना झाला. दरम्यान या सामन्यात भरताने या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध 101 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात 61 चेंडूत विराटने 122 धावा केल्या. जवळपास 33 महिन्यांनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक (Century) केलं. सामन्यात शतक पूर्ण झाल्यानंतर विराटने सर्वांत आधी आनंदाने अंगठीचं चुंबन घेतलं. तसेच हे शतक त्याने अनुष्का आणि मुलगी वामिकाला समर्पित केलं. तसेच अनुष्का शर्माने (Anushka Sharma) कठीण प्रसंगात माझी खूप साथ दिली, असं तो म्हणाला. त्यानंतर पत्नी अनुष्कानेही भावनिक पोस्ट लिहित विराटवर प्रेमाचा वर्षाव केला.
Ajit Pawar: “बारामतीत माझे काम बोलते”, अजित पवारांचा विरोधकांच्या बारामती दौऱ्यावरून घणाघात
तसेच अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहलीचे काही फोटो पोस्ट केले. पोस्टमध्ये अनुष्का म्हणाली की, ‘नेहमीच तुझ्यासोबत.. मग ते कधीही आणि कोणत्याही गोष्टीसाठी का असेना,’ असं तिने लिहिलं.दरम्यान विराट कोहलीने अनुष्काच्या या पोस्टवर विराटने हृदयाचे इमोटिकॉन पोस्ट केले.तसेच सर्वसामान्यांसोबतच श्रद्धा कपूर, सोनाली बेंद्रे, वरुण धवन, जयदीप अहलावत यांसारख्या सेलिब्रिटींनी विराटच्या कामगि रीची प्रशंसा केली.
तसेच अनुष्कासुद्धा लवकरच प्रेक्षकांना क्रिकेट खेळताना दिसणार आहे. कारण ‘चकदा एक्स्प्रेस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीची भूमिका साकारत आहे. बऱ्याच कालावधीनंतर ती मोठ्या पडद्यावर परतणार आहे.
Raktchandan: रक्तचंदनाला आंतरराषट्रीय बाजारात लाखोंची मागणी, रक्तचंदनाचा ‘हा’ आहे औषधी उपयोग