अर्थसंकल्प सादर होताच विवेक अग्निहोत्रींची दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Vivek Agnihotri's reaction as soon as the budget was presented; said…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर (Budget 2023) केला आहे. यामध्ये त्यांनी विविध महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या असून नवीन कर संरचना देखील जाहीर केली आहे. तसेच यंदाच्या संकल्पात सात उद्दिष्टांना महत्त्व देण्यात आले आहे. ज्यांना सप्तर्षी असे संबोधले जात आहे. हा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंर अनेक राजकीय नेत्यांनी त्याचबरोबर सेलिब्रिटींनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नवीन अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी घेतले ‘हे’ धडाकेबाज निर्णय; वाचा एका क्लिकवर

यामध्येच आता प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. विवेक अग्निहोत्री सामाजिक राजकीय मुद्यांवर कायमच भाष्य करत असतात. सध्या त्यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की, “स्लॅब ५ लाखावरून ७ लाख करण्याचा निर्णय अतिशय शानदार आहे, वाह” या शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवीन अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी घेतले ‘हे’ धडाकेबाज निर्णय; वाचा एका क्लिकवर

अर्थसंकल्पात भर देण्यात आलेली 7 उद्दिष्टे

1) पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक
2) विकासपट सर्वसमावेशक करणे
3) खऱ्या अर्थाने क्षमतांचा वापर करणे
4) हरितविकास ( Green Development)
5) युवकांचे सामर्थ्य
6) आर्थिक क्षेत्र उंचावणे
7) सर्व व्यक्तींना लाभ देणे

यंदाच्या अर्थसंकल्प बजेटमध्ये स्वस्त झाल्या ‘या’ गोष्टी; वाचा सविस्तर

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

1) अगामी काळात कृषी क्षेत्रासाठी डिजीटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अॅग्रीकल्चर अॅक्सिलरेटर फंड उभारण्यात येणार आहे. यामुळे शेती स्टार्टअपना प्रोत्साहन मिळणार आहे.
2) भरड धान्याचे उत्पादन, त्याची विक्री आणि संशोधन यासाठी सरकार पुढाकार घेणार.
3) देशात नवीन 157 नर्सिंग कॉलेज स्थापन होणार.
4) लहान व किशोरवयीन मुलांसाठी नॅशनल डिजिटल लायब्ररी स्थापन होणार.
5) जेष्ठ नागरिकांना बचत योजनेवर सुविधा मिळणार
6) पंतप्रधान आवास योजनेचा निधी 66 टक्क्यांनी वाढला.
7) पायाभूत सुविधांसाठी निधीमध्ये 33 टक्क्यांनी वाढ
8) देशात 50 नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहेत.

मोठी बातमी! दुगधव्यवसायसाठी अर्थसंकल्पात २० लाख कोटींची तरतुद

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *