दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम व करियरच्या संधी!

Vocational courses and career opportunities for 10th and 12th students!

पुणे : आजकाल अनेक विद्यार्थ्यांना दहावी किंवा बारावी झाल्यानंतर पुढील पारंपरिक शिक्षण घेण्याची इच्छा नसते. त्यांना अधिक वेळ वाट न बघता लगेच पैसे कमवणे महत्वाचे वाटते. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती यामागचं एक प्रमुख कारण असू शकते.

दहावी व बारावी नंतर हे शक्य आहे. यासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर चांगल्या आणि मान्यताप्राप्त संस्थेतून कौशल्यावर आधारित रोजगारभिमुख व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

सध्या महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळच्या माध्यमातून शासकीय मान्यताप्राप्त व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने इलेक्ट्रोनिक्स, इलेक्ट्रीकल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, संगणक, पॅरामेडिकल, सिव्हील, अॅग्रिकल्चर, केमिकल, इन्स्ट्रुमेन्टशन, केटरिंग, टेक्सटाईल, सौंदर्यशास्र, अॅपरल, हस्तकला, प्रिंटींग, मासमेडिया, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, भाषा व इतर अनेक क्षेत्रातील कोर्सेसचा समावेश आहे.

यामध्ये सहा महिने, एक वर्षे व दोन वर्षे कालावधीचे प्रमाणपत्र व डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार कोर्सेची निवड करू आपल्या आवडीचे कौशल्य प्राप्त करून घेवू शकतात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रात सहज जॉब मिळतील व पैसे कमवणे सुरु होईल. त्याचबरोबर ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल ते आपला व्यवसाय सुरु करून चांगली कमाई करू शकतात.

व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन कौशल्यपूर्ण बनवले जाते यामुळे विद्यार्थी अधिक कुशल आणि प्रशिक्षित होतात आणि याचा फायदा त्यांना जॉब प्लेसमेंट किवां स्वता:चा व्यवसाय करताना होतो.

सध्या नवनवीन उद्योगांना उत्तेजन देण्याच्या भारत सरकारच्या धोरणानुसार इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाइल, बांधकाम, हेल्थकेअर, अॅग्रिकल्चर इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये अमर्याद संधी निर्माण होत आहेत. या कंपन्यांना आपला विस्तार करण्यासाठी कुशल व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नितांत आवश्यकता भासत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी दहावी किवां बारावी नंतर वरील ‌विषयांचे व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध असल्याने उत्तम पगाराची नोकरी सहज मिळेल. महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळाद्वारे उपलब्ध कोर्सेसच्या अधिक माहितीसाठी https://msbsd.edu.in या संकेतस्थळाला भेट द्या.

श्री. बाळासाहेब झरेकर
संचालक – युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर
मो. 9860673482

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *