ब्लू क्रॉस लॅबरोटरीज प्रा. लि. कंपनीच्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत नाशिक भागातील गरीब, गरजू व बेरोजगार तरुणानांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या किंवा दहावी-बारावीपर्यंत शिकण घेतलेल्या युवकांना “इलेक्ट्रिशियन” या तांत्रिक कोर्सचे प्रशिक्षण युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटरचाच्या नाशिक शाखेत देण्यात येत आहे.
मोठी बातमी! भर सभेत गोळ्या मारलेले आरोग्यमंत्री नबा दास यांचे निधन
अनेकदा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या युवकांना तांत्रिक कोर्सेसचे प्रशिक्षण घेणे शक्य होत नाही आणि त्यामुळे ते रोजगारापासून वंचित राहतात अशा तरुणांना या उपक्रमाअंतर्गत त्यांचे कौशल्य विकसित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून बेरोजगारी कमी करण्याचा हेतूने हा प्रकल्प राबवविला जात आहे. सदर प्रशिक्षण प्रॅक्टिकलवर आधारित असून प्रतक्ष कामाचा अनुभव मिळण्यासाठी इंडस्ट्रीयल व्हिजीट्सचे आयोजन केले जाते. या बरोबरच या युवकांना यशस्वी मुलाखत तंत्र आणि सॉफ्ट स्कीलचे प्रशिक्षण देखील दिले जाते. ज्या युवकांना स्वतःचा व्यवसाय करावयाचा आहे अशा युवकांसाठी यशस्वी उद्योजक होण्यासाठी तज्ञांकडून विशेष मार्गदर्शन दिले जाते. कोर्से पूर्ण झाल्यानंतर कॅम्पस इंटर्व्हीव व जॉब फेअर्सद्वारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
या उपक्रमाअंतर्गत यावर्षी पहिल्या टप्प्यात ६० विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिशियन या कोर्सचे प्रशिक्षण देऊन विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून दिला असून त्यांचा त्यावर उदरनिर्वाह सुरू आहे. सध्या ३० विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण चालू असून त्यांची ब्लू क्रॉस कंपनी नाशिकचे सी.एस.आर. हेड श्री. एस. के. माहुली व बेजॉन देसाई फाउंडेशनचे संचालक डॉ. भारद्वाज यांनी भेट घेवून मार्गदर्शन केले, यावेळी युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक श्री. बाळासाहेब झरेकर व विजय कुलकर्णी हे देखील उपस्थित होते.