मागच्या काही दिवसापासून चर्चेत असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु होणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी प्रचारासाठी चांगलीच ताकद लावली होती. त्यामुळे आज मतदार कोणाला मत देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आताची सर्वात मोठी बातमी! अहमदनगरमधील गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट
कसब्यात दुहेरी लढत होत असून भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Raas) यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) निवडणूक लढवत आहेत. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होत असून. अश्विनी जगतात तेथून निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवतायेत. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत.
“अजित पवारांचे पुण्यात येऊन बारा वाजवीन”, नारायण राणेंचा गंभीर इशारा
या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर दोन्ही पक्षाकडून अनेक दिग्गज नेते उमेदावाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. त्यामुळे मतदार कोणाला मतदान करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात सत्तांतर करण्यासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले; संजय राऊतांचा गौप्यस्फोट