Vasant More। वसंत मोरे यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

Vasant More

Vasant More । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सर्व पक्षांना नेत्यांवर धक्के बसत आहेत. मनसेलाही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पक्षाला राम राम ठोकला. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार यावर अजूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यांनी त्यांनी पक्षभेट घेतल्याने कोणत्या पक्षात जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी लोकसभेसाठी वसंत मोरे पुण्यातून लढण्यास उत्सुक आहेत.

आगामी निवडणूक आपण कोणत्या पक्षातून लढवणार यावर आता वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोलताना वसंत मोरे म्हणाले की,”माझं भविष्य उज्वल आहे. त्यामुळे मी वेळ घेत आहे. चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभे निवडणूक होणार आहे. मी महाविकास आघाडीतील नेत्यांना भेटलो आहे. काही दिवसातच त्यांची यादी जाहीर होणार आहे. जे काय होईल ते चांगले होईल, मला जे साध्य करायचं आहे तेच मी साध्य करणार असून मी योग्य दिशेने चाललो आहे. “

Maharashtra Politics । बड्या आमदाराचे उद्धव ठाकरेंबाबत धक्कादायक वक्तव्य; राजकीय वर्तुळात खळबळ

“लवकरच माझी योग्य वेळ येणार आहे. योग्य वेळी मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, जरी मी अपक्ष लढलो तरी मी नंबर एकला राहणार आहे. 2022 मध्येच मला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, ” असा गौप्यस्फोट वसंत मोरे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा झाली आहे.

Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का! लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Spread the love