Wall Collapsed In Gurugram । धक्कादायक! मंदिराची भिंत अचानक कोसळली, 5 मजूर अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

Wall Collapsed In Gurugram

Wall Collapsed In Gurugram । हरियाणातील गुरुग्राममध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील जगन्नाथ मंदिरातील बांधकाम सुरू असलेली भिंत अचानक कोसळली. ढिगाऱ्याखाली ५ मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्व मजूर बांधकाम सुरू असलेल्या मंदिरात कामात व्यस्त होते. भिंत पडल्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही घटनास्थळी पोहोचले. माहिती मिळताच पोलीस बचाव पथकासह दाखल झाले. बचावकार्य सुरू आहे.

Ajit Pawar । अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का! बडा नेता उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात सेक्टर 15 च्या सिव्हिल लाइन्स भाग 2 मध्ये झाला. अपघातात जखमी झालेल्या कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप मृत्यूची नोंद नाही. पोलिस जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. (Wall Collapsed In Gurugram)

Baramti News । धक्कादायक बातमी! बारामतीमध्ये हुंड्यासाठी मुलीला दोन्ही हातपाय बांधून शेततळ्यात बुडवून मारले

तळघर बांधण्याचे काम सुरू होते

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार मंदिराच्या तळघराचे काम सुरू होते. ज्यासाठी अनेक मजूर उपस्थित होते आणि बांधकाम सुरू असलेल्या मंदिरात कामाला लागले होते. तळघरात चिखल झाल्यामुळे मंदिराजवळील वीज मंडळाची भिंत तुटून कामगारांवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यात अनेक कामगार अडकले.

Corona Update । कोरोनाच्या नव्या प्रकाराने चीनमध्ये पुन्हा एकदा हाहाकार माजवला, स्मशानभूमीवर लांबच लांब रांगा लागल्या; मृतदेहांचा ढीग दिसू लागला

Spread the love