दिवसेंदिवस आरोग्य सेवांच्या ( Medical facilities) दरात सुद्धा वाढ झाली आहे. यामुळे आजकाल अनेक लोकांना रुग्णालयाचा खर्च परवडत नाही. यामुळे खूपदा आजार गंभीर असला तरी तो अंगावर काढला जातो. यामुळे कधी कधी एखादा रुग्ण फक्त उपचार न झाल्याने दगावतो. मात्र भारत सरकारने एक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत रुग्णांना रुग्णालयात सवलत दिली जाते. तसेच मोठे ऑपरेशन किंवा उपचारासाठी आर्थिक मदत ( finantial help for economically backword people) केली जाते. धर्मादय रुग्णालय असे या योजनेचे नाव आहे. ( Dharmaday Rugnalay Yojana)
पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला! ‘या’ नेत्याला मिळणार संधी…
सध्या राज्यभरात एकूण ४७६ धर्मादय रुग्णालये आहेत. यामध्ये १० हजारांहून अधिक खाटा धर्मादाय योजनेतील रुग्णांसाठी राखीव आहेत. इथे रुग्णांना विनाशुल्क किंवा सवलतीच्या दरामध्ये उपचार मिळतो. मात्र राज्यातील भरपूर गरजू लोकांना या योजनेबद्दल पुरेशी माहिती नाही. यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
Crime | कार्यक्रमात नाचताना धक्का लागला म्हणून वादावादी! मध्ये पडणाऱ्या तरुणाच्या पोटात घुपसला चाकू
कोणाला धर्मादय रुग्णालय योजनेचा लाभ घेता येतो ?
१) दारिद्र्यरेषेखालील नाव असणारे रेशनकार्डधारक
२) ८० ते ८५ हजारादरम्यान वार्षिक उत्पन्न असणारे रुग्ण
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
१) दारिद्र्यरेषेखाली असल्याचे पिवळे रेशनकार्ड
२) तहसीलदारांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला
ब्रेकिंग! अवघ्या काही तासातच होणार महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला… संपूर्ण राज्याच लक्ष
धर्मादय रुग्णालय योजनेमध्ये समाविष्ट असणारी प्रमुख रुग्णालये
१)ब्रीच कॅन्डी
२) जसलोक हॉस्पिटल, मुंबई
३) लीलावती मेडिकल ट्रस्ट
४) कोकीलाबेन
५) नानावटी
६)भाटीया जनरल हॉस्पिटल
७) बॉम्बे हॉस्पिटल ऍन्ड मेडीकल रिसर्च्
८) मित्तल फाऊंडेशन ट्रस्ट