Site icon e लोकहित | Marathi News

यात्रेत गौतमी पाटीलला बोलवायचं का? अजित पवारांचे हे विधान होतंय व्हायरल! म्हणाले, ” रात्री…”

Want to call Gautami Patil on the yatra? Ajit Pawar's 'this' statement is going viral! Said, "Night..."

अजित पवार ( Ajit Pawar) आपल्या रोखठोक भूमिकेमुळे कायम चर्चेत असतात. तसेच त्यांचे मिश्किल टोले देखील जबरदस्त असतात. सध्या अजित पवारांचे एक मिश्किल विधान चांगलेच चर्चेत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे विधान कोणत्याही राजकीय नेत्याविषयी नसून ते प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील ( Gautami Patil) बद्दल आहे. बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP) एका मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी यात्रेचा विषय निघताच त्यांनी गौतमी पाटीलचे नाव घेतले. ( Ajit Pawar Speaks about Gautami Patil)

Viral : सार्वजनिक ठिकाणी तरुणीला रिल्स बनविणे पडले महागात पोलीस महिला आली अन् तरुणीला…” पाहा Video

मेळाव्यात बोलताना एका कार्यकर्त्याने यात्रेचा उल्लेख करताच अजित पवार म्हणाले की यात्रा वैगरे रात्री करायच्या! यात्रेत पाटील बाईंना बोलवायचं का? अजित पवारांचे हे मिश्किल विधान सध्या सगळीकडे चर्चेत आहे. यात्रा असली तरी, ती यात्रा रात्री आहे! रात्री कापाकापी…रात्री तमाशा…मग यात्रेत पाटीलबाईला बोलवायचं का रात्री? काय तिचं नाव? गौतमी!” असे अजित पवार यावेळी म्हणाले.

खुशखबर! पाच लाखांपर्यंतचे उपचार होणार आता मोफत; केंद्र सरकारने सुरू केली ‘ही’ योजना

सगळ्यांना बघता येईल, असे काम सर्वांनी करावे एवढेच माझे म्हणणे आहे. असंही अजित पवार म्हणाले आहेत. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी ‘नॉट रिचेबल’ असल्याबाबत बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांचेही चांगलेच कान टोचले आहेत. दरम्यान अजित पवारांचे गौतमी पाटीलबाबतचे विधान सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहे.

Ajit Pawar : ठरलं! “…तर अजित पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री”; ठाकरे गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रस्ताव

Spread the love
Exit mobile version