जमिनीच्या (Land) संदर्भातील एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे सातबारा उतारा होय. जर तुमच्याकडे हा उतारा नसेल तर तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शेतीशिवाय अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये सातबारा उताऱ्याचा वापर होतो. परंतु बऱ्याचवेळा ऑनलाईन सातबारा उतारा (Online Satbara Utara) आणि हस्तलिखित सातबारा उतारा (Satbara Utara) यामध्ये चुका होतात. या चुका आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाहीत. (Latest Marathi News)
परंतु सातबारा उताऱ्यातील (Satbara 7/12 Utara) एका चुकीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते. जर तुम्हाला हे नुकसान टाळायचे असेल तर आजच त्याची दुरुस्ती करा. परंतु त्यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही हे काम ऑनलाईन पद्धतीने करू शकता. संपूर्ण राज्यात यासाठी एक ऑगस्टपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. (Satbara Utara Online Application)
Rashmi Shukla । फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा!
अशाप्रकारे करा दुरुस्ती
- तुम्हाला सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करायची असेल तर सर्वात अगोदर ई हक्क पोर्टलवर जाणून सातबारा फेरफारवर क्लिक करा.
- या ठिकाणी अर्ज करून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
- ऑनलाईन अर्ज संबंधितांकडे गेल्यानंतर तलाठ्याकडून तपासाला जातो.
- यानंतर झालेली दुरुस्ती तहसीलदारांकडे मान्यतेकरिता पाठवली जाते.
Shiv Sena News । एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! शेकडो समर्थकांसह बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश
लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी
- जर उताऱ्यावर क्यूआर कोड नसेल तर तो सातबारा बोगस असतो. तुम्ही या उताऱ्यावरील क्यूआर कोड स्कॅन केला तर ओरिजनल सातबारा पाहता येतो.
- त्याशिवाय सातबारा उतारा हा खरा असल्यास तर त्यावर युनिकोड असतो. तसेच यावर ई-महाभूमीचा लोगो आहे का नाही तेही पाहावे.
- जर सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची स्वाक्षरी नसेल तर तो उतारा खोटा समजावा.
Onion Rate । कांदा प्रश्नावरून सरकारचा मोठा निर्णय! प्रतिक्विंटल २४१० दराने होणार खरेदी
हे ही पहा