दातांचा पिवळेपणा दूर करायचाय? करा ‘हे’ घरगुती उपाय

Want to get rid of yellow teeth? Do 'these' home remedies

दातांचा पिवळेपणा (Yellowness of teeth) दूर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी करा हे घरगुती उपाय. जे दात उजळण्यासाठी काही रुपयांत विकत घेता येतात. आणि परिणामही मिळतील उत्कृष्ट. जाणून घ्या या उपयांबद्दल

1) खोबरेल तेल: आजही भारतातील अनेक भागांमध्ये लोक दातांच्या उपचारासाठी खोबरेल तेल (Coconut oil) वापरतात. तोंडातून येणारा पिवळापणा दूर करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाची मदत घेऊ शकता. दररोज एकदा नारळाच्या तेलाचा गार्गल करा आणि काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल.

जनावरांना ‘हे’ तीन प्रकारचे गवत द्या, दूध वाढीसाठी होईल मदत

2)कोरफड जेल: एक चमचा कोरफड, थोडे ग्लिसरीन, लिंबू तेल आणि बेकिंग सोडा एक कप पाण्यात मिसळा. गुळगुळीत पेस्ट बनवल्यानंतर ब्रशच्या मदतीने दातांवर लावा आणि थोडा वेळ घासून घ्या. असे सुमारे 3 ते 4 दिवस करा तुम्हाला लवकरच चांगला परिणाम दिसून येईल.

Narendra Modi: मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष ऑफर, ’56 इंची थाळी खणाऱ्याला मिळणार 8.5 लखांच बक्षीस

3)लवंग: आजी-आजोबांच्या काळापासून दातांची समस्या दूर करण्यासाठी लवंगाची (cloves) मदत घेतली जात आहे. दातांच्या काळजीसाठी फायदेशीर लवंगाची अनेक उत्पादने बाजारात आहेत. लवंगा बारीक करून त्यात ऑलिव्ह ऑईल घाला. दररोज ब्रश करा आणि हे फक्त 2 मिनिटांसाठी करा.

4) संत्र्याची साल: संत्र्याची साल (orange peel) देखील दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे. पण हे फार कमी लोकांना माहित आहे. संत्र्याच्या सालीची पेस्ट बनवून दातांवर लावा. या हंगामात हे फळ तुम्हाला मिळणार नसले तरी त्याची पावडर सहज मिळू शकते. या घरगुती उपायाने व्हिटॅमिन सीची कमतरता देखील दूर होईल.

No Homework: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! गृहपाठ बंद करण्याचा शिंदे सरकारचा विचार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *