Pandharpur News । महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी कायम गर्दी पाहायला मिळते. भाविक कित्येक तास उभे राहून विठुरायाचे दर्शन घेतात. परंतु एक धक्कादायक प्रकार पंढरपुरमधून (Pandharpur) समोर आला आहे. विठ्ठलाचे झटपट दर्शन घेण्यासाठी भाविकांना पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)
Koyna Dam । दिलासादायक! संततधार पावसामुळे कोयना धरणात ‘इतका’ पाणीसाठा
मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबादमधून आलेल्या दोन भाविकांना झटपट दर्शन घ्यायचे होते. एका हॉटेल व्यवस्थापकाच्या मदतीने झटपट दर्शन पैसे घेऊन दर्शन करून देणारे एजंट सागर बडवे आणि शंतनु उत्पात यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, प्रति व्यक्तीसाठी दोन हजार रुपये इतका दर ठरल्यानंतर त्यांना या एजंटनी मंदिरात आणले.
त्याने मंदिरातील संबंधिताना सांगून या दोघांना दर्शनाला पाठवले असता त्यांच्यावर मंदिर सुरक्षा व्यवस्थेवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला संशय आला. त्यांनी या दोन भाविकांना थांबवून माहिती घेतली असता दोन हजार रुपये देण्याचे मान्य करून दर्शनाला आल्याचे सांगितले. मंदिर समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या एजंटविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. दरम्यान, या पैसे घेऊन दर्शन करून देणाऱ्यांच्या साखळीत मंदिरातील दुसरे कोणी सहभागी आहे का याचा पोलीस तपास पोलीस करत आहे.
YouTube Account। सावधान! तुम्हीही यूट्यूब वापरताना करताय का ही चूक? वेळीच थांबा नाहीतर..