दिल्ली : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना शेती (Farming) क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. इतकंच नाही तर शेतकऱ्यांनी (Farmers) शेती करत व्यवसायाकडे वळावे यासाठी सरकार अनेक व्यवसायांवर सबसिडीसुद्धा (subsidy) देत आहे. या सबसीडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागत आहे. केंद्र सरकार मत्स्यपालनाच्या व्यवसायावरही (fishery business) सबसिडी देत आहे. मत्स्यपालन हे ग्रामीण भागात उत्पन्नाचे चांगले साधन म्हणून उदयास आले आहे. त्यामुळे ग्रामीण भारतातील शेतकरी हे मोठ्या संख्येने हा व्यवसाय करत आहेत. आणि या व्यवसायातून चांगला नफा कमावत आहेत.
Chandni Chowk: पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर स्फोटाने जमीनदोस्त
अनुसूचित जाती व महिलांना 60 टक्के अनुदान
केंद्र सरकारने सप्टेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पंतप्रधान मत्स्य संपदा योजना (Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) सुरू केली आली. ही आतापर्यंतची मत्स्यपालन क्षेत्रातील सर्वात मोठी योजना मानली जात आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना कर्ज आणि मत्स्यपालनाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. जरी तुम्हालाही मत्स्यपालनासाठी कर्ज घ्यायचे आहे, तर प्रथम तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील मत्स्य विभागाशी संपर्क साधावा लागेल. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व महिलांना मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी 60 टक्के अनुदान दिले जाते. तसेच इतर सर्वांसाठी 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी प्रदान केली जाते.
‘या’ कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीला चार ते पाच हजारांचा दर
असा करा अर्ज
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या वेबसाइटला भेट देऊन द्या. तसेच तुम्ही https://dof.gov.in/pmmsy या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.
आजपासून सरकारी कार्यालयात फोनवर बोलताना ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावं लागणार; शासननिर्णय जारी
कमाल 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज
विशेष म्हणजे पीएम मत्स्य संपदा योजनेंतर्गत तुम्ही मत्स्य किसान क्रेडिट कार्ड बनवू शकता. तसेच हे क्रेडिट कार्ड बनवून हमीशिवाय 1.60 लाख कर्ज घेऊ शकतात. इतकंच नाही तर या क्रेडिट कार्डवरून तुम्हाला कमाल 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येते. तसेच किसान क्रेडिट कार्डवर कर्ज घेतल्यावर इतर कर्जाच्या तुलनेत कमी व्याज द्यावे लागते.
Chandni Chowk: पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर स्फोटाने जमीनदोस्त