Maharashtra Rain Update । निम्मा ऑगस्ट महिना संपला तरीही राज्यात पावसाने (Maharashtra Rain) दडी मारली आहे. अनेक शेतकऱ्यांनी जेमतेम पावसाच्या जोरावर पेरण्या केल्या आहेत. जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर पाण्याविना पिके जळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पुन्हा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Latest Marathi News)
राज्यातील पाऊस सध्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे लांबणीवर पडला आहे. परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यामध्ये 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा पावसाला (IMD Alert) सुरुवात होईल. तसेच मराठवाड्याच्या वेगवेगळ्या परिसरात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Rain in Maharashtra)
Politics News | “हे फक्त घोषणा करणारं सरकार”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज्य सरकारवर निशाणा
हवामान खात्याच्या माहितीनुसार विदर्भामध्ये विजांच्या गडगटांसह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. पश्चिम, मध्य आणि दक्षिम महाराष्ट्रात पाऊस सुरु राहील. दरम्यान, 13 ऑगस्टपासून राज्यात पुन्हा पावसाळी वाऱ्यांसाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. परंतु, राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे तिथे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.