सध्या चालू असलेल्या उन्हाळ्याच्या मौसमात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. बंगालच्या उपसागरात वादळाची स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पावसाला पोषक असे वातावरण तयार झाले आहे.
रोहित पवार यांच्या पुढाकाराने कर्जत-जामखेडचा दुष्काळ हटणार!
एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच राज्यात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. यादरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळी स्थितीमुळे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या 24 तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह अन्य भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
कांद्यापाठोपाठ आता कलिंगडही शेतकऱ्यांना रडवणार! मिळतोय फक्त ‘इतका’ भाव
यंदा संपूर्ण देशभरात 90 टक्क्यांच्या जवळजवळ पाऊसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्या गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाची काळजी घेण्याचं आव्हान कृषी विभागानं केलं आहे.
साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर बाबांनी मागितली माफी; म्हणाले…