आफताब बाप होणार होता?; तरीही केली श्रद्धाची हत्या

Was Aftab going to be a father?; Still killed Shraddha

दिल्ली येथे लिव्ह इन रिलेशनशीप राहत असणाऱ्या श्रद्धा या तरुणीच्या हत्येने देशात सध्या गोंधळ सुरू आहे. ( Delhi crime) श्रद्धा सोबत राहणाऱ्या आफताब या तरूणानेच तिची हत्या केल्याने वेगवेगळ्या स्तरांतून लिव्ह इन रिलेशनशिप ( Live in relationship) वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आफताबने श्रद्धाची फक्त हत्याच केली नाही तर हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून जंगलात फेकले आहेत. यासंबंधी एक नवी माहिती सध्या समोर येत आहे.

Ajit Pawar: अजित पवारांच्या अडचणीत वाढ? शिखर बँक घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी

हत्या झालेली श्रद्धा वालकर ही तरुणी मूळची मुंबईची असून ती आपला प्रियकर आफताब सोबत दिल्ली येथे राहत होती. यावेळी श्रद्धा ने आफताबच्या मागे लग्नासाठी तगादा लावल्याने आफताबने तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने तिच्या शरीराचे 30 च्या वर तुकडे करून स्वतःच्या घरात फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर कित्येक दिवस तो ते तुकडे मुंबईतील ( Mumbai) जंगलात न्हेऊन फेकत होता. इतकच नाही तर तिथे दुर्गंधी पसरू नये म्हणून अगरबत्ती देखील लावत होता. अशी माहिती आफताब च्या जबाबातून समोर आली आहे.

शेतकऱ्यांना मोठा फटका; टोमॅटोच्या दरात घसरण

मात्र या हत्याकांडासंदर्भात पोलिसांकडून एक नवीन माहिती समोर येत आहे. श्रद्धाची हत्या झाली तेव्हा ती गरोदर असावी, असा संशय पोलिसांना आहे. नुकताच श्रध्दाच्या माकडहाडाचा एक तुकडा पोलिसांना सापडला आहे. यावरून श्रद्धा गरोदर होती की नाही हे शोधणे खरंतर कठीण आहे. पोलिसांना तपासात नवनवीन धागे दोरे सापडत आहेत. यातून या हत्याकांडा संदर्भात आणखी नवीन गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *