“सरकारची परवानगी घेतली होती का?”; अमृता फडणवीसांच्या रियाजसोबतच्या रीलवर राष्ट्रवादीच्या महिला प्रवक्त्यांनी दिली प्रतिक्रिया

"Was government permission obtained?"; NCP female spokeswoman reacts to Amrita Fadnavis' reel with Riaz

अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांचं “आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” हे नवीन पंजाबी गाणं रिलीज झालं आहे. अमृता फडणवीस यांच्या नवीन पंजाबी गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली यांनतर अमृता फडणवीस यांनी रिल स्टार रियाझ आली याच्यासोबत ‘आज मूज बना लिया’ गाण्यावर एक रिल बनवली आहे. दरम्यान, हा त्यांचा डान्स वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग! कार आणि ट्रकचा भीषण अपघात; ९ जण जागीच ठार

अमृता फडणवीस यांनी ही रील सरकारी बंगल्यावर बनवली आहे त्यामुळे सध्या चर्चेत आहे. असं म्हणत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी अमृता फडणवीस यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत हल्लाबोल केलाय.

धक्कादायक! शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतच ठेवलं कोंडून

राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे म्हणाल्या की, अमृता फडणवीस यांनी शेअर केलेला व्हिडीओ एका सरकारी बंगल्यामध्ये बनवलेला आहे. अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ बनवताना सरकारची अधिकृतपणे परवानगी घेतली होती का? हे देखील व्हायरल करा असं त्या म्हणाल्या आहेत.

ब्रेकिंग! अभिनेत्री राखी सावंतचा गर्भपात? चर्चाना उधाण

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्यांचे गाणे रिलीज होताच काही वेळातच लाखो व्हयूज येतात. त्यांच्या या नवीन पंजाबी गाण्यामुळे त्यांना ट्रोल देखील करण्यात आले मात्र त्यांनी देखील ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. दरम्यान, “आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” या गाण्यातून प्रेक्षकांना अमृता फडणवीस यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळतोय.

बिग ब्रेकिंग! बृजभूषण सिंह यांच्यावर ‘सेक्स स्कॅण्डल’चे गंभीर आरोप

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *