मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या. दरम्यान बोलताना त्यांनी रस्त्यांच्या प्रश्नावर सडकून टीका केली. यावेळी शर्मिला ठाकरे म्हणाल्या की , “मी रात्री १२ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन करून मुंबई-गोवा महामार्गाकडे लक्ष द्या अस सांगितलं.”
तसेच महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक कर देतो असं नमूद करत आधी राज्यातील रस्ते सुधारायला हवे, माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील, असं मला वाटतं.” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
Sudha Murti : पद्मश्रीने सन्मानित सुधा मूर्तींचा प्रेरणादायी प्रवास ; वाचा सविस्तर
पुढे शर्मिला ठाकरे पुढे म्हणाल्या की , “किमान रस्ते तरी नीट करा. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्राची जनता देशाला ४० ते ५० टक्के कर देते.महाराष्ट्र केंद्राला करातून सर्वाधिक पैसे देतो, मग तुम्ही तुमचं राज्य तर नीट करा.आपल्याकडेच राजकारणी मुद्दाम चांगले रस्ते का करत नाहीत?”महाराष्ट्र मागासलेलं राज्य नाही.
Tamhini Ghat : ताम्हिणी घाटात भीषण अपघात, कार 200 फूट घसरली, 3 जण जागीच ठार
महाराष्ट्र राज्याची सीमा कोणत्याही बाजूने सोडली तर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, हैदराबाद या सगळ्या ठिकाणी गुळगुळीत रस्ते दिसतात. मग महाराष्ट्रातलेच रस्ते का नीट नाहीत. असा सवाल देखील शर्मिला ठाकरे यांनी केला.