लग्न असो किंवा इतर कोणतेही समारंभ असो जोपर्यंत डान्स होत नाही तोपर्यंत कार्यक्रम अपूर्ण वाटतो. कार्यक्रमामध्ये डान्स केलेले एकापेक्षा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. यामध्ये काही लोक असे असतात की डान्स करण्याच्या नादात त्यांना आपण काय करतोय याचही भान राहत नाही. सध्या देखील असाच एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी घातला तुफान राडा!
सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक ‘आंटी’ एकदम बेभान होऊन डान्स करताना दिसत आहे. मात्र त्याचवेळी एका लहान मुलामुळे सगळी मजाच विस्कळीत झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
‘भोला’ चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला! रामनवमीची सुट्टी असूनही थिएटर्स रिकामेच
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगेवेगळ्या कमेंट करत आहेत. यावर कमेंट करत एका युजरने लिहिले की, ‘अरे आंटी बच्चे को तो देखो’ तर काही युजर हसण्याचे ईमोजी कमेंट करत आहेत.
कांद्याला अनुदान मिळण्याचा आज शेवटचा दिवस; पाहा काय आहेत कांद्याचे दर?