Nagpur Flood । नागपूर : नागपूरमध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातले आहे. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊन पाणी शहरात शिरले आहे. पुरामुळे रस्ते उखडले आहेत. अग्निशमन दल देखील मदतीला धावून आले आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain in Nagpur) येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, मुसळधार पावसामुळे 10 हजार घरांत पाणी (Nagpur Rain) घुसले आहे. यात दुकानदारांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त दुकानादारांना राज्य सरकारकडून ५० हजार रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. हवामान खात्याकडून (IMD) नागपूरमध्ये आज पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Sanjay Datt । नशेमध्ये थेट सेटवर गेला अन् संजय दत्तने अभिनेत्री सोबत केले धक्कादायक कृत्य!
नागपुरमध्ये कमी वेळेत 110 मिलिमीटर पाऊस झाला असून नाग नदीचे पाणी वस्त्यांमध्ये शिरले आहे. मुसळधार पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 14 जनावरांना मृत्यू झाला आहे. शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. नागपूरमध्ये नवीन पूल बांधण्यात येणार आहेत. तसेच घरात पाणी शिरलेल्या नागरिकांची जेवणाची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
YouTube । युट्युबनं आणलं नवीन AI फीचर! मिनिटात होणार व्हिडीओ एडिट