
माळशिरस तालुक्यातील पिंपरी गावातील एका शेतकऱ्याने आत्महत्याचा इशारा दिला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी गावातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आर्थिक वरदान असणाऱ्या सहकारी विविध विकास सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक पिंपरी गावासाठी नुकतीच पार पडली. त्या चेअरमन पदाच्या निवडणूकीत 8-5 अशा फरकाने सुनील कर्चे विजयी झाले. विरोधकांचा झालेला अनपेक्षित पराभव त्यांच्या चांगला जिव्हारी लागला या पराभवाचा बदला म्हणून विरोधकांनी नूतन चेअरमन झालेल्या सुनील कर्चे यांनी मोराची हून पिंपरीत शेतीसाठी आणलेल्या पाईपलाईन विरोधकांनी त्यांच्या शेतात फोडली.
या राजकीय द्वेषापोटी फोडलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी गेल्यास विरोधक भांडण करणे शक्यता असल्याने चेअरमन सुनील कर्चे यांनी कायद्याचा आधार घेत नातेपुते पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि पोलिसांना या घटनेबद्दलची माहिती दिली. पोलिसांना कलम 430 अन्वय शेती किंवा पिण्याच्या पाण्यासाठी आणलेल्या पाईपलाईन दुरुस्तीला संरक्षण देण्याचा अधिकार असतानाही नातेपुते पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. सपंगे साहेब यांनी कारवाई करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप सुनिल कर्चे यांनी केला आहे.
Weather Update । पावसाची पुन्हा हुलकावणी, ‘या’ दिवशी होणार दमदार एन्ट्री
जे कायद्याचे रक्षण करतात त्यांच्या दारात जर न्याय मिळत नसेल तर न्या मागायचं कुठे आणि याच रागातून सुनील करचे यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करून सुनील कर्चे यांना न्याय द्यावा अशी मागणी पिंपरी ग्रामस्थ करत आहेत.
गिरणी कामगारांसाठी सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा
(प्रतिनिधी सौरभ कर्चे)