सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. मागच्या दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांनाच चक्रावून सोडणारी घटना घडली. अजित पवार (Ajit pAwar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असताना अनेक समर्थक अजित पवार व शरद पवार यांच्या गटात सहभागी होत आहेत,उपाध्यक्ष इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस संदीप चांदगुडे यांनी आपली भूमिका जाहीर केली असून मी शरद पवारांसोबत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
त्यामुळे आगामी काळात पवार गटाचे तालुका अध्यक्ष पद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. संदीप चांदगुडे हे सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपली भूमिका जाहीर केली असून आपण साहेबांसोबत असल्याचे जाहीर केले आहे.
ओडिशातील बालासोर अपघातात चूक नेमकी कोणाची? तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड