कुस्ती ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. पुण्यात (Pune) १० जानेवारीपासून पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहेत. मोठ्या व मानाच्या कुस्ती स्पर्धांपैक एक स्पर्धा म्हणून ‘महाराष्ट्र केसरी’ ची ओळख आहे. दरम्यान काल पुण्यात ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला.असून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा शिवराज राक्षे याने पटकावली आहे.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील, ब्रिजभूषण सिंह, क्रीडामंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत या स्पर्धा जल्लोषात पार पडल्या. यावेळी भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्हीदेखील राजकारणात कुस्ती करतो, असं वक्तव त्यांनी केली असून त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
मोठी बातमी! शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्हीदेखील राजकारणात कुस्ती करतो. पण अलीकडच्या काळात फक्त टीव्हीवरच्या स्क्रीनवर आमची कुस्ती चालते. पण या कुस्तीमधूनही कधीकधी राजकारणातला एक महाराष्ट्र केसरी हा मुख्यमंत्री बनतो, हे आपण नुकतंच पाहिलं आहे. असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलं आहे.
मोठी बातमी! गडकरींना आलेल्या धमकीच्या फोन कॉलचे कर्नाटक कनेक्शन?