केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना ( Shivsena) हे नाव व धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. यानंतर शिंदे गटाने अंतर्गत पक्षबांधणीसाठी पाऊले उचलली आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या आमदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामध्ये व्हीपचा मुद्दा चर्चेत आला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने किमान पुढचे दोन आठवडे तरी ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये, असे निर्देश दिले आहेत. मात्र अशातच शिवसेनेचे नेते भरत गोगावले ( Bharat Gogavle) यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. आता यावर प्रतिक्रिया देत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडलं आहे.
ह्रता दुर्गुळे ठरली ‘महाराष्ट्राची फेव्हरेट’; ट्रॉफी पाहून म्हणाली…
भास्कर जाधव म्हणाले, अशा व्हीपला आम्ही भीकही घालत नाही. माझं घर जाळण्यात आल, आमची सुरक्षा काढण्यात आली या गोष्टींना आम्ही घाबरलो नाही, तर यांच्या व्हीपला आम्ही काय घाबरणार? असे कित्येक व्हीप आले आणि गेले, अशा शब्दांमध्ये आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधिमंडळाच्या बाहेर ते पत्राकारांशी बोलत होते.
स्त्यावर पिचकाऱ्या मारणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल; सीसीटीव्हीची करडी नजर कायम
त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, शिंदे सरकारच्या शेतकऱ्यांसाठी आणि अन्य नागरिकांसाठी अनेक आश्वासने या सरकारने दिली होती. मात्र, अजून एकही आश्वासन यांनी पूर्ण केलं नाही. भाजपा ही केवळ जुमला पार्टी आहे. असं देखील यावेळी भास्कर जाधव म्हणाले आहेत.
‘आता तरी प्रेक्षकांचा वनवास संपवा’, रंग माझा वेगळा मालिकेचा ‘तो’ प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले