मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबई मेट्रो ३ च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवलाय. यावेळी जोरदार एकनाथ शिंदेनी राजकीय टोलेबाजी केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्हाला बॅटिंग करायला पूर्ण वेळ नाही. आमच्याकडे अडीच वर्षेच आहेत. त्यामुळे आम्हाला कमी बॉलवर जास्त रन काढायचे आहेत,” असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. कुलाबा-वांद्रे-सिप्स मेट्रो लाइन-३ च्या प्रोटोटाईप ट्रेन चाचणी शुभारंभ कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते.
Eknath Shinde: पोलीस, अग्नीवर भरतीसाठी तरुणांना आवश्यक सुविधा पुरवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश
“अश्विनी भिडे मुंबई मेट्रोचं काम पाहत आहेत. काम करणारा आणि स्वतः कामात झोकून देणारा अधिकारीच सरकारचं काम लोकांपर्यंत पोहचवत असतो. नाहीतर एखादा प्रकल्प सुरू आहे आणि फक्त चाललंय म्हणून चाललंय असं नाही, सरकारी काम आणि सहा महिने थांब असं आम्हाला करायचं नाही. तर आम्हाला कमी वेळेत जास्त करायचंय”.
Manish Sisodia: मनीष सिसोदिया यांच्या बँक लॉकरची होणार आज चौकशी; वाचा सविस्तर
“आम्हाला बॅटिंग करायला पूर्ण वेळ नाही. आमच्याकडे अडीच वर्षेच आहेत. त्यामुळे आम्हाला कमी बॉलवर जास्त रन काढायचे आहेत. असे देखील एकनाथ शिंदेनी नमूद केले.