
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गट जसं म्हणेल तसच निवडणूक आयोग करत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आम्हाला विश्वास नाही. असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
VIDEO: नाणेफेक दरम्यान रोहित शर्माने केली ‘ही’ मोठी घोडचूक
धनुष्यबाण आणि शिवसेना कुणाची याबाबत निवणूक आयोगामध्ये अत्यंत महत्त्वाची सुनावणी चालू असतानाच भास्कर जाधव यांनी निवडणूक आयोगावर अविश्वास दर्शवल्याने चर्चाना उधाण आले आहे.
तिने ब्रेक ऐवजी अँक्सिलेटर दाबला आणि पुढची घटना वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यापासून शिवसेनेचे ठाकरे व शिंदे असे दोन गट पडले. या दोन्ही गटांमध्ये शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाचा ? यावरून वाद सुरू आहेत. याबाबत काल निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. मागील अनेक दिवसांपासून रखडलेला हा निर्णय किमान कालतरी होईल म्हणून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र कालही शिवसेना व धनुष्यबाण नेमका कुणाचा ? यावर निर्णय झाला नसून याबाबतची सुनावणी पुढे ढकलली गेली आहे.
ब्रेकिंग! महेश कोठारे यांच्या वडिलांचे निधन
सोमवारी 23 जानेवारी रोजी शिंदे व ठाकरे गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. या दोन्ही गटांकडून लेखी उत्तरं मिळाल्यानंतर निवडणूक आयोग पुढील सुनावणी ३० जानेवारीला करणार आहे.
‘या’ भाजप प्रदेशाध्यक्षाने केला मोठा गौप्स्फोट; म्हणाले, भाजपकडूनच पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा कट